पुणे पदवीधर मतदारसंघ : नीता ढमालेंनी प्रितिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समाधीस भेट देऊन घेतले आशिर्वाद

पुणे – पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार नीता ढमाले यांनी आज कराडच्या प्रितिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समाधीस भेट देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नीता ढमाले यांनी या निमित्ताने पूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. पदवीधर मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधत त्यांच्या समस्या त्या समजावून घेत आहेत.

आपले राजकीय प्रेरणास्थान असलेल्या स्व. यशवंतरावांच्या स्मृतिस वंदन केल्यानंतर त्या म्हणाल्या ” लोकशाहीचे विकेंद्रीकरण हाच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाचा पाया होता. सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात यावा. प्रत्येक जाती धर्माचा तसेच महिलांचा राजकारणात सहभाग असावा हे तत्व त्यांनी बोलूनच दाखवललं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा पण प्रत्येक व्यक्तीस सोबत घेऊन जाण्याचं बळ हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातूनच तुम्हास मिळू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. याचं विचारांवर मी पदवीधरांच्या समस्यांना, रोजगाराच्या प्रश्नांना भिडण्याचे स्वप्न साकार करू इच्छीते. आज कराड येथील प्रितीसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर लढण्याचे हे बळ द्विगुणीत झाले.