Pune Hadapsar Crime | फोटो मॉर्फ करुन बदनामी करण्याची तरुणीला धमकी, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | बहिणीसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारातून तक्रारदार महिलेसोबत अश्लील बोलून (Speaking Obscenely) विनयभंग केला (Molestation Case). तसेच आरोपीच्या मित्राने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल करण्याची धमकी (Threat Of Morph Photos Viral) दिली. हा प्रकार हडपसर येथील भाजी मंडईच्या (Bhaji Mandai Hadapsar) रिक्षा स्टॉपवर शुक्रवारी (दि.29) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे.

याबाबत पर्वती दर्शन येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बाळु वाजरे व लोकेश कदम यांच्यासह दोन मोबाईल धारकांवर आयपीसी 354, 354(ड), 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Hadapsar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आणि आरोपी बाळु वाजरे यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. याच आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात बाळु वाजरे याने 19 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता हडपसर पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. फिर्यादी रिक्षा स्टॉप येथे आल्या असता आरोपीने त्यांचा हात पकडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तर आरोपी बाळु वाजरे याचा मित्र लोकेश कदम याने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास
वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फिर्यादी यांना फोन केले.
त्याने फिर्यादी यांना फोटो मॉर्फ करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
तसेच फर्यादी यांना शिवीगाळ करुन जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?