भारतीय चलन दाखवण्याची बतावणीकरून नेले ३० हजार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय चलन दाखवण्याची बतावणीकरून दोघा भामट्यांनी मोटार सर्व्हिस सेंटर चालकाजवळील नोटांमधून हातचलाकीने ३० हजार घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचे रामटेकडी परिसरात एस. के. कार सर्व्हिस सेंटर आहे. दोघेजण दुपारी पावणेचारच्या सुमारास तेथे आले होते. त्यावेळी भामट्यांनी तरुणाला आम्हाला भारतीय चलन पाहायचे आहे, असे म्हणत ९० हजार रुपयांचे नोटांचा बंडल घेतले. नोटा मोजण्याच्या बहाणा करीत त्यातील ३० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक व्ही. बी. जगताप हे करत आहेत.

Visit : Policenama.com