मुंढव्यात दीड लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, मुंढव्यात चोरट्यांन बंद फ्लॅट फोडून दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी आनंद श्रीवास्तव (वय 33, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कुटूंबियासह पिंगळे वस्तीवरील रोहन इशाता इमारतीत राहायला आहे. कामानिमित्त ते कुटूंबियासह 8 फेब्रुवारीला परगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 1 लाख 49 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन अधिक तपास करीत आहेत.