पुणे : लग्न करण्यासाठी प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच पोलिसांनी पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लग्न करण्यासाठी प्रियकराच्या मदतीनं पतीचा खूनकरून मृतदेह तीन दिवस घरात ठेवला. रात्रीत विल्हेवाट लावण्याचे प्लॅनिंग सुरू असतानाच पोलिसांना खबर मिळाली आणि खुनाला वाचा फुटली. हडपसर भागात ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.

आयुज शेख (वय 29, रा. उरुळी देवाची) असे खून झाल्याचे नाव आहे. तर हिना आयुज शेख (26) व तिचा प्रियकर मोहसीन शेख (25) याला अटक करण्यात आली आहे.

आयुज आणि हिना यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. दोघेही कोंढवा भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी ते उरुळी देवाची येथे राहण्यास आले होते. भाड्याने राहत होते. दरम्यान मोहसीन आणि हीना यांचे प्रेम संबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांनी आयुज याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी राहत्या घरात आयुज याचा दोघांनी खून केला.

मृतदेह घरातच बेडखाली झाकून ठेवला. शुक्रवारी रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यापूर्वीच वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

Visit : Policenama.com