पुणे जिल्ह्यातील केडगावमधील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट, 3 आरोपींना अटक, 2 महिलांची सुटका

केडगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ता.दौंड येथे असणाऱ्या वाकडापुल नजीक हॉटेल धनश्री याठिकाणी महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असलेल्या तीन आरोपींना बारामती क्राईम ब्रँच, दौंड उपविभागीय अधिकारी आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले आहे, यावेळी येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
वाकडापुल येथे असणाऱ्या हॉटेल धनश्री मध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (आय.पी.एस) ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली असता त्यांनी सविस्तर माहिती घेउन बारामती क्राईम ब्रँचचे अधिकारी, यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि जवान यांना सोबत घेऊन हॉटेल धनश्री येथे अचानक छापा मारला असता खालील नमूद आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी दोन महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळून आले. सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या 3 इसमांना ताब्यात घेऊन 2 महिलांची सुटका करण्यात येऊन त्यांना महिला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या कारवाईमध्ये पियुष रामचंद्र देशमुख (वय 22 राहणार केडगाव तालुका दौंड जि.पुणे) कृष्णा संजय गोंगाने (रा. हिंगोली) प्रशांत श्रावण मोहोड (वय 35 रा.चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती) या तीन आरोपींविरुद्ध यवत पोलीस स्टेशनला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, निरोध असा 32,170 रु चा माल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.जयंत मीना (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (आयपीएस) श्रीमती ऐश्वर्या शर्मा, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, यवत पोलिस स्टेशनचे जवान संपत खबाले , गणेश पोटे महिला पोलिस जवान अश्विनी भोसले यांनी केली आहे.