Pune Kasba Bypoll Elections | ‘कसबा मनसे लढवू शकते’, पोटनिवडणुकीत मनसे रिंगणात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकीचा (Pune Kasba Bypoll Elections) कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Bypoll Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. कसबा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसने (Congress) दावा केला असताना शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शिवसेनेचा उमेदवार देण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे केली आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर पुणे मनसेने (Pune MNS) ‘कसबा मनसे लढवू शकते’ असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे.

 

कसबा पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Bypoll Elections) पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कसबा मनसे लढवू शकते, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. इच्छुकांची नावे आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांच्या मार्फत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याकडे दिली जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहे. येत्या 3 फेब्रुवारीला मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

शिवसेनेकडून संजय मोरेंना उमेदवारी देण्याची मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रविवारी (दि.29) पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कसबा पोटनिवडणूक बाबत चर्चा झाली. ही निवडणूक शिवसेनेने लढवावी आणि शहराध्यक्ष संजय मोरे (City President Sanjay More) यांना उमेदवारी द्यावी, असा एकमुखी सुर उमटला. काँग्रेस पोटनिवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेने का लढवू नये? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

 

कसबा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ
कसबा विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde),
रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), संगीता तिवारी (Sangita Tiwari), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar),
कमल व्यवहारे (Kamal Vyavaye) हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या सर्वांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Congress MLA Sangram Thopete) यांनी पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.

 

Web Title :- Pune Kasba Bypoll Elections | kasaba mns can fight maharashtra navnirman sena in pune bypoll elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘आजच्या घडीला संजय राऊत राजकारणातील जोकर’ – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट