Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा आणि चिंचवडमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान, कौल कुणाला? उमेदवारांची धाकधुक वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकच्या मतदानासाठी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात सर्वच उमेदवारांनी आपल्या कुटुंबासमेत मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदानाचा (Voting) हक्क बजावला. याशिवाय सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) रांगोळ्यांच्या पायघड्या घालून आणि फुलं देऊन मतदारांचं स्वगत करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी हळद-कुंकू लावून मतदारांचं स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची देखील सोय करण्यात आली होती.

 

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात मुख्य लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap), राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या तीन प्रमुख उमेदवारांसह चिंचवड निवडणुकीच्या रिंगणात 28 उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे 2 मार्चला समजणार आहे.

 

चिंचवड मध्ये … टक्के तर कसब्यात … टक्के मतदान

कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) सकाळी सात वजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 यावेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 यावेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 यावेळेत 20.68 तर 1 ते 3 यावेळेत 30.55 टक्के, 3 ते 5 यावेळेत 41.1 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 यावेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 यावेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 यावेळेत 18.50 तर 1 ते 3 यावेळेत 30.05 टक्के, 3 ते 5 या वेळेत 45.25 टक्के मतदान झाले आहे. तर शेवटच्या एक तासात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करुन मतदानाचा हक्क बजावला. यामुळे मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढला. चिंचवडमध्ये … टक्के मतदान झाले. तर कसब्यात … टक्के मतदान झाले.

 

असे झाले मतदान…

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख 75 हजार 679 मतदार आहेत. यैपैकी…. एवढ्या मतदारांनी मतदान केले. यामध्ये ….. पुरुष मतदारांनी तर …. महिला मतदारांनी मतदान केले. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी 270 मतदान केंद्रांवर मतदान झाले.

तर चिंचवड मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख 68 हजार 954 मतदार आहेत. यामध्ये ….. पुरुष मतदारांनी तर …. महिला मतदारांनी मतदान केले. चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी 510 केंद्रांवर मतदान झाले..

निवडणुकीकडे राज्याचे लक्ष

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name)आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) देखील जोरदार प्रचार केला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दोन्ही मतदारसंघात रोड शो करुन शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला होता. तर त्याला शिंदे गाटाकडून प्रतिउत्तर देण्यात आले होते. त्यामुळे ही पोटनिवडणुक शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

 

व्हिलचेअरवर येऊन गिरीश बापटांनी केलं मतदान

कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी व्हिलचेअरवरुन ऑक्सिजन सपोर्टवर येऊन संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमरास मतदन केले. गिरीश बापट यांनी अहिल्यादेवी प्रशालेत आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाला गालबोट…

चिंचवड मतदारसंघामध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर हाणामारीची घटना घडली. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक यांच्यात हाणामारी झाली. पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तसेच कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह
पैशांचे वाटप करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचले आणि
त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, असं काँग्रेस कार्यकर्त्यांच म्हणण आहे.
त्यानंतर गणेश बिडकर आणि काँग्रेसकडून परस्परविरोधी तक्रार
समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) देण्यात आली.

या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

कसब्यातील काँग्रेसेचे उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने,
चिंचवडचे भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे,
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे, खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane),
खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

उमेदवारांची धाकधूक वाढली

कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे मतदान टक्केवारीवरुन दिसत आहे.
कमी मतदान झाल्याने प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे येत्या 2 मार्चला निकालानंतर समजेल.
या पोटनिवडणुकीत अनेक राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली
असून या निवडणूकीच्या निकालाचा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | More than 50 percent voting
in Kasba and Chinchwad, Kaul Kani? The intimidation of the candidates increased

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा