पुण्यातील कात्रज परिसरात घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी कात्रज येथे भरदिवसा घरफोडीकरून 2 लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीकांत शितोळे (वय २८, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत कुटूंबियासह कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अरुणोदय सोसायटीत राहायला आहेत. बाहेर गावी गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतप्रवेश केला. तसेच घरातील 1 लाख ९५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोते अधिक तपास करीत आहेत.