Pune Kharadi Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kharadi Crime | मुलांना रेल्वेत नकरी लावण्याच्या बहाण्याने (Lure Of Job In Railway) एका व्यक्तीची आठ लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 23 मार्च 2024 या कालावधीत खराडी येथील थिटे वस्ती (Thite Vasti Kharadi) येथे घडला आहे. याप्रकरणी मुंबईतील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रामचंद्र अयोध्या प्रसाद परदेशी (वय-55 रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) यांनी शनिवारी (दि.23) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राजेश जगदीश शिंदे (वय-52), कुणाल भागुराम जाधव (वय-35 दोघे रा. कल्याण ईस्ट, मुंबई) यांच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना फोन करुन संपर्क साधला. त्यांना दोन मुलांना व त्यांच्या ओळखीच्या दोन मुलांना रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन करुन नोकरी लावण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ऑनलाइन 10 लाख 50 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्य़ादी यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दोन लाख रुपये परत केले. त्यानंतर वारंवार उर्वरित 8 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आरोपींनी पैसे परत न करता फिर्य़ादी यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यावर चाकूने हल्ला, येरवडा परिसरातील घटना

Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”