Pune : घरफोड्या करणाऱ्या एका सराईताला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   घरफोड्या करणाऱ्या एका सराईताला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निजाम शेख ( वय २३, रा. अशोकनगर, कोंढवा बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्याचा घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांना या घटना रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान माहिती घेत असताना सराईत गुन्हेगार निजाम शेख मिठानगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अमित साळुंखे व पोलीस अंमलदार ज्योतिबा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निजामला मिठानगर येथे ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन घरफोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिला. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.