पिस्तुल बाळगणार्‍याला राजगड परिसरातून अटक, एलसीबीची कारवाई

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याला राजगड परिसरात पकडण्यात आले आहे.

अखिलेश उर्फ गोट्या राजेंद्र खाटपे (वय 25, रा. मोरदरी-शिवतारवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहिजे आरोपी व सराईतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यादरम्यान, एलसीबीचे पथक राजगड परिसरात माहिती घेत होते. त्यावेळी पोलिसांना शिवतारवाडी- मोरदरी येथील स्मशानभूमी समोर असणारे बसस्टॉपवर अखिलेश हा पिस्तूल घेऊन उभा असल्याची
माहिती मिळाली.

त्यानुसार,पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोउपनि रामेश्वर धोंडगे, सफौ. दत्तात्रय जगताप, कर्मचारी राजेंद्र चंदनशिव, प्रमोद नवले, अमोल शेडगे, मंगेश भगत यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला ताब्यात घेऊन राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने हे पिस्तूल कोठून आणि कशसासाठी आणले आहे, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.