Pune Lok Sabha Election 2024 | मनसे महायुतीच्या उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी घेणार मेळावे – राजेंद्र वागस्कर

ADV

भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील व त्यांचे मताधिक्य वाढवे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही मनसे चे नेते आणि पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र वागस्कर (Rajendra Babu Wagaskar) व मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी दिली.

प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा आणि मनसे च्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) , प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा संयोजक राजेश पांडे (Rajesh Pande), लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले (Shrinath Bhimale), महायुतीचे समन्वयक व प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), पुणे शहर सरचिटणीस राजेंद्र शिळमकर, रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते तर मनसे च्या वतीने नेते राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे,प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे, योगेश खैरे प्रवक्ते मनसे इ पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Lok Sabha Election 2024)

मनसे ने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाठिंबा दिल्याने निश्चितच आमची ताकद वाढली
असून मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याचा विक्रम करतील असा विश्वास वाटतो असे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.
मनसे चे कार्यकर्ते दैनंदिन प्रचारात तर सहभागी होतीलच पण स्वतंत्रपणे शहर पातळीवर आणि
विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

मनसे च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखला जाईल व प्रचाराच्या नियोजनात
मनसे चा सहभाग असेल असे महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात