Coronavirus Lockdown : लोणी काळभोर पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर पोलिसनामा (शरद पुजारी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एकवीस दिवसाचा लाॅकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी टवाळखोर विनाकारण गावात मोकाट फिरताना दिसतात त्यांना आवर घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु नानाविध बहाणे सांगून रस्त्यावर मोकाट फिरतच आहेत अशांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी कंबर कसली असून काल सोमवारी रात्री पासून अनेक दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे.पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण भागातील काही गावातील तक्रारी वाढल्याने ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन लक्ष ठेवणार असल्याचे सांगितल्याने विभागीय पोलिस अधिकारी कामाला लागले आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपापल्या घरात राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तसेच अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडले पाहिजे असे असताना काही जण केवळ उत्सुकतेने रस्त्यावर येऊन दुचाकी वाहनातून चकरा मारताना दिसतात यावर काल हवेली विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कडक भूमिका घेतली व अनेक दुचाकी वाहनांवर कारवाई केली. आज मंगळवारी देखिल ही कारवाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

अत्यावश्यक वाहनाखेरीज कोणत्याही दुचाकी व चारचाकी वाहनांना इंधन पुरवठा केला जाणार नाही असा शासनाचा आदेश असताना या टवाळखोर चालकांना पेट्रोल कसे मिळते हा प्रश्न आहे यावरुन पेट्रोलचा काळाबाजार या भागात मोठ्या प्रमाणावर चालू असला पाहीजे अशा व्यक्ती शोधून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यावर किती कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे