लोणीकंद परिसरात लुटमार करणारी टोळी गजाआड

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत लोणीकंद माथा येथे पायी चालणाऱ्या इसमाला तीन अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकल आडवी घालून मारहाण करुन लुटमार केली. अशा आशयाची तक्रार लोणीकंद पोलिसात पंकज कुमार प्रजापती यांनी केली होती.

या गुन्ह्याचा सखोल तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अरोपी 1) तुषार रखमाजी पवार वय 19 राहणार पिंपळनेर ता. पारनेर जि. अहमदनगर , 2) विजय राजू तुपे वय 22 रा.आवटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार याचे मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आरोपिंकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच उर्वरित आरोपीचा लोणीकंद पोलीस शोध घेत आहेत. यातील आरोपी तुषार पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवर श्रीगोंदा, रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर यांनी लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, श्रीमंत होनमाने, सुरज वळेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. फौजदार दत्तात्रेय गिरमकर, सहा. फौजदार दयानंद लीमन, ज्ञानेश्वर क्षिरसागर, जनार्दन शेळके, यांनी केलेली आहे.