Pune Metroman Shashikant Limaye | पुण्याचे मेट्रोमॅन शशिकांत लिमये यांचं 71 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metroman Shashikant Limaye | पुण्याचे मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे शशिकांत लिमये यांचं निधन (Died) झालं आहे. ते 71 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने काल (गुरुवारी) त्याचं राहत्या घरी निधन झालं. हृदयविकाराचा झटका येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.

 

शशिकांत लिमये (Pune Metroman Shashikant Limaye) यांनी पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे. भारतीय रेल्वेतील तज्ञ अधिकारी म्हणूनसुद्धा त्यांची ओळख होती. 2014 मध्ये महामेट्रोने त्यांची पुणे मेट्रो प्रकल्पाचे (Pune Metro Project) सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यातही लिमये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. तसेच, लिमये हे भारतीय रेल्वेत नोकरीस होते.
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाल्यानंतर ते सक्रिय होते. त्याचबरोबर पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2012 पासून मेट्रो प्रकल्पासाठी ते आग्रही होते. पुणे मेट्रोचा आराखडा त्यांनी योग्य सल्ला दिला होता. 2014 मध्ये महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना पुण्याचे मेट्रोमॅन असं म्हटले जात होते.

 

Web Title :- Pune Metroman Shashikant Limaye | pune metroman shashikant limaye passes away at 71

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा