खळबळजनक ! पुण्यातील सिहंगड कॉलेजजवळील टेकडीवर निर्घृण खून, मृतदेह जाळला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिहंगड कॉलेजच्या टेकडीवरील ग्राऊंडवर एका तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अद्याप त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी सिहंगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिहंगड टेकडीवर कॉलेजचे क्रिकेट ग्राऊंड आहे. ग्राऊंड शेजारी मोकळ्या जागेत बुधवारी सकाळी काही तरुणांना जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सिहंगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुणाच्या डोके दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला आहे. त्यामुळे तरुणाची ओळख पटविण्यास अडचणी येत आहेत. साधारण त्याचे वय 25 ते 27 असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.