पुणे : ‘प्रेमसंबंध तोडून टाक नाही तर मुस्लीम धर्म स्वीकार’ असं म्हणत हिंदू प्रियकर युवकाचं घर पेटवलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात एका तरुणाला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची धमकी देत त्याचे घर पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या तरुणाचे मुस्लीम समाजातील मुलीशी प्रेम संबंध होते. प्रेम संबंध तोडून टाक किंवा धर्म स्विकार असे म्हणत त्याचे घर जाळ्यात आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी भागात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दूध व्यावसायिक आहेत. दरम्यान, त्याचे एका मुस्लिम तरुणीशी प्रेम संबंध निर्माण झाले. तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या दोन तरुणांना याची माहिती समजली. त्यांनी तरुणीला प्रथम समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिचे देखील प्रेम असल्याने तिने काही एक ऐकले नाही. त्यानंतर या दोन तरुणांनी फिर्यादी तरुणीला धमकवण्यास सुरुवात केली. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी या तरुणांनी फिर्यादी तरुणाला प्रेम संबंध तोडून टाकण्यासाठी धमकावले. तर प्रेम संबंध ठेवायची असतील आणि विविह करायचा असल्यास त्याला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या घरावर रॉकेल टाकून घर पेटवले. हा प्रकार घडल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही कुटुंब एकत्रित बोलावले. त्यांना समजावून सांगत इतर परिणाम याची माहिती दिली. त्यानंतर मोहला कमिटी व काही व्यक्ती यांची बैठक घेतली. त्यावेळी सर्व परिस्थिती सामान्य झाली. त्यांनंतर देखील पोलिसांनी याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय केले असून, दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितले.