Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिज परिसरात अपघातांची (Pune Navale Bridge Accident) मालिका सुरु असून काल (रविवार) तीन ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आज (सोमवार) अज्ञात वाहनाने जोरदार धडक (unknown vehicle hit) दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Accident) झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (PSI Nitin Jadhav), अमोल काळे (Amol Kale) व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती हा बेवारस तसेच वेडसर असल्याचे त्याच्या कपड्यावरुन दिसून येत आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Navale Bridge Accident)

 

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. रुग्णवाहिका आल्यानंतर मृतदेह उचलण्यासाठी नागरिक येत नसल्याने पोलिसांनी स्वत: मृतदेह रुग्णवाहिकेत उचलून ठेवला. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | death pedestrian after being hit vehicle incident near navale bridge accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

Punit Balan Group | युवा कलाकारांनी गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा दुसरा दिवस; बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध

Mumbai Crime | पुणे ग्रामीणच्या दौंडमधील DySp नं छेडछाड केल्याचा आरोप ! वकिल महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यात रस्त्यावरील गुंडागर्दीत तुफान वाढ ! रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुणांना भर रस्त्यात गाठून लुबाडण्याच्या घटना