Pune Navale Bridge Accident | नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरुच, भरधाव ट्रकचा भीषण अपघात, एक ठार तर एक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | आंबेगाव बुद्रुक – नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा (Pune Navale Bridge Accident) हॉटस्पॉट (Hotspot) ठरला असून गुरुवारी रात्री आणखी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज बाह्य (Katraj External) वळण मार्गावरील (Detour Route) नवले ब्रिजकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. अशोक लेलँड शोरूम समोर (Ashok Leyland Showroom) भरधाव ट्रक डिव्हायडरला (Divider) धडकून पलटी झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ट्रक चालकासह एकजण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

महेंद्र चौधरी राजावर (Mahendra Chaudhary Rajaver) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रंजन कुमार मंडल (Ranjan Kumar Mandal) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चालक जसवंत उराव Jaswant Urao (रा. सुस, पाषाण) याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक हा नवले ब्रिजकडून (Pune Navale Bridge Accident) कात्रजच्या दिशेने जात होता.
अशोक लेलँड समोर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.
यामुळे ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातानंतर वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊ नये यासाठी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | one killed one seriously injured in navale bridge to katraj road bypass pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा