Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात ! रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने उडवले; 3 जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | कात्रजहून (Katraj) पुण्याकडे येणार्‍या नवीन सातारा – पुणे महामार्गावरील (Pune-Satara Highway) नवले पुल (Pune Navale Bridge Accident) हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याहून सातार्‍याकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

 

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. (Navale Bridge Accident) याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने एक ट्रक जात होता. नवले पुलापासून (Navale Bridge Accident) पुढे काही अंतरावर भूमकर पुलाजवळ त्याने पुढे असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही जण थांबले होते. रस्त्याकडेला थांबलेल्यांवर ट्रक गेला. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. या तरुणांच्या हातात बॅगा होत्या. ट्रकने त्यांना अक्षरश फरफटत नेले.

 

 

या अपघाताने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) घटनास्थळी पोहचत आहेत.

 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | three dead in accident near Navale Bridge bhumkar Bridge pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Edible Oil Prices | सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, प्रमुख कंपन्यांनी किमतीत केली कपात; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Thane | 25000 हजाराची लाच घेताना महापालिकेचा सहायक आयुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

चिंताजनक ! राज्यात Omicron Variant चा उद्रेक, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

 

Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन

 

 

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

 

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई | तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला