Pune NCP | पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पार्किंग पॉलिसी स्वाहा, 24×7 पाणी योजना स्वाहा, सिक्युरिटी टेंडर स्वाहा, 14 लाखांचे झाड स्वाहा, ई-व्हेईकल घोटाळा स्वाहा, अ‍ॅमिनिटी स्पेस घोटाळा स्वाहा, अशा प्रकारच्या सर्व घोटाळ्यांच्या उद्घोषणा करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीन आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) पुणे महापालिकेसमोर (PMC) हवन आंदोलन केले. यावळी दिपाली धुमाळ, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे, नंदा लोणकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने (BJP) स्थायी समितीमध्ये (Standing Committee) मंगळवारी ‘सिग्नल’च्या देखभालीसाठी तब्बल 57.94 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
गरज नसल्याने कामावरील खर्चाचे नवे रेकॉर्ड भाजपने केले आहे.
याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेसमोर भाजपमध्ये असलेल्या भस्मासुराचा अंत होण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन केले.

 

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, कोणते सिग्नल स्मार्ट (Signal Smart) होणार, नेमका खर्चाचा अंदाज,
याबाबतीत कोणताही विचार विनिमय न करता विदिया टेलिलिंक्स या कंपनीच्या भल्यासाठी तब्बल 58 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सत्ताधाऱ्यांना भाजपला ठेकेदारांचा एवढा पुळका का आहे हे समजत नाही.
पारदर्शक कारभाराच्या नावाखाली सत्ते आलेले भाजप हे एकामागे एक भ्रष्टाचाराचा (corruption) इतिहास रचत आहे.

दररोज भाजप भ्रष्टाचाराचे नवनवीन उच्चांक गाठत आहे. कोणताही नवीन सिग्नल बसवणार नसतांना केवळ जुन्या सिग्नलच्या देखभालीसाठी 58 कोटी रुपये देणे म्हणजे
पुणेकरांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडा आहे. राष्ट्रावादी पुणेकरांची अशा प्रकारे लूट कधीही होऊ देणार नाही.
त्यासाठी वाटेल तो त्रास भोगण्याची आमची तयारी असल्याचे जगताप यांनी सांगितले.

 

Web Title :Pune NCP | Pune bjp making history corruption agitation ncp pune ncp city president prashant jagtap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Smart City Company-ATMS | कॉंग्रेस, NCP चे काही नगरसेवक नेहमीप्रमाणे केवळ ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून आरोप करताहेत; सभागृहनेते गणेश बिडकर यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

Diwali Shopping Trends | व्हॉईस कमांड आणि मूडनुसार बदलेल तुमच्या घरातील प्रकाश

Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्यासाठी आधार E-KYC ने होईल काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया