Pune News | पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहरामध्ये मट्रोच्या (Pune Metro) कामासाठी खोदकाम करत असताना हँडग्रेनेड (Hand Grenade) सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाषाण रस्त्यावरील आयशर या संस्थेजवळ मेट्रोचे पत्रे लावण्यासाठी सुरू असलेल्या खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आले. हे जमीनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Pune News)

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior PI Balaji Pandhare) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला (Bomb Squad) प्राचारण केले. (Pune News) बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा हॅन्डग्रेनेड ताब्यात घेतला. तो जागेवरच निकामी करण्यात आला. तसेच या दरम्यान या परिसरातील वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिशकालीन असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पत्रे लावण्याचे काम सुरु होते. त्यासाठी खोदकाम करण्यात येत होते.
या दरम्यान हँडग्रेनेड आढळून आले. पुणे मेट्रोकडून पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली होती.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार