Pune News | पुण्यात प्रदुषणाने गाठली धोक्याची पातळी, प्रशासन अलर्ट मोडवर, बांधकामांसाठी कडक नियम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | दिल्ली, मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्रदुषणाने (Pune Pollution) धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे राज्य व स्थानिक प्रशासन अलर्ट झाले असून बांधकामांसाठी अधिक काटेकोर नियम करण्यात आले असून त्यांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बांधकामांच्या (Construction) साईटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून अंमलबजावणी होत नसल्याचे आढल्यास ही बांधकामे थांबविणे अथवा सील केली जाणार आहेत. (Pune News)

राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने वाढत्या प्रदुषणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सदर विभागांनी म्हटले आहे की, पुण्यात ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि १ एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावे. धूलिकण रोखण्यासाठी स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्या वेळी करावा.

हवा प्रदूषणात (Air Pollution) पुणे शहर धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली बांधकामे, उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखणे आवश्यक आहे. यासाठी राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने मार्गदशक सुचना दिल्या आहेत. (Pune News)

बांधकामाच्या ठिकाणी हे नियम पाळणे बंधनकारक

  • ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि १ एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावे.
  • सध्या सुरू असलेली बांधकामे, पाडण्यात येत असलेली बांधकामे आणि प्रकल्पांच्या कामावर ओले हिरवे कापड, ओले ज्यूट कापड अथवा ताडपत्रीने झाकणे बंधनकारक.
  • बांधकाम कामगारांना मास्क, गॉगल बंधनकारक.
  • बांधकामाच्या ठिकाणी माती, खडी, वाळू झाकून ठेवावी.
  • उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान २० फूट बॅरिकेडिंग असावेत.
  • राडारोडा टाकल्यास वाहने जप्त केली जातील.

या सूचना बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणार आहेत. तसेच तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
याबाबत आदेश काढण्यात आल्यानंतर या उपाययोजना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्या जातील.
शिवाय, त्याचे चित्रीकरणही केले जाईल. नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळल्यास अशी बांधकामे थांबवली
जाती अथवा सील केली जातील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar Accident News | दिवाळी गिफ्ट अन् मिठाई घरी घेऊन जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; छ. संभाजीनगर येथील घटना