Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

पुणे : Pune News | कोकणातील रायगड व रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक पातळ्यांवर मदतकार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगरपालिकेतील (pune corporation) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक (NCP corporators) आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

सध्या रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वच यंत्रणा सक्षमपणे सामना करीत आहेत. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

Jayant Patil | अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटलांनी कॅबिनेटची बैठक अर्धवट सोडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

दररोज अंघोळ केल्यानं होऊ शकतं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | One month salary of NCP corporators to CM Assistance Fund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update