दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. कोंढवा येथील लुल्लानगरमध्ये घडली आहे.

सुनील रामलाल जैस्वाल (आकुर्डी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकी चालक वैष्णव आनंद गावडे (18, रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात असताना वैष्णव याच्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप वैष्णव याला पोलिसांनी अटक केलेली नाही. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.