पुण्यात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हडपसर परिसरात दुपारी घडली. रघुनाथ एकनाथ सोनवणे (वय ४०, रा. हडपसर ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एकनाथ सोनवणे (वय ६५, रा. हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ एका खासगी कंपनीत नोकरीस होते. रविवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवर चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक आर. आर. पाटील करीत आहेत.