Pune : शहरातील 2 कुंटणखाने सील बंद करण्याचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात वेश्या व्यवसाय करून घेत असलेले दोन कुंठणखाना सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक कुंटणखाना फरासखाना तर दुसरा स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.

शहर पोलीस दलाचा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारला. यानंतर अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान फरासखाना व स्वारगेट येथे दोन ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली.

स्वारगेट येथील आयुर्वेद पंचकर्म बॉडी ट्रीटमेंट सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. हे सेंटर सील करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलिसांनी वरिष्ठांकडे पाठविला होता. तसेच, बुधवार पेठेतील जुनी सागर बिल्डींग येथे वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्यामुळे समजल्यानंतर कारवाई केली होती. त्यानंतर याबाबत कारवाई सुरू झाली होती. त्यानुसार हे दोन्ही कुंटणखाने सील करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.