Pune Pimpri Chinchwad Crime News | जास्त परतावा देण्याच्या अमिषाने महिलेची 14 लाखांची फसवणूक, आरोपीला अटक; तळेगाव दाभाडे येथील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंतवणूक स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची मुळ मुद्दल आणि व्याज असे एकूण 14 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी (PCPC Police) एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते गुरुवार (दि.21 डिसेंबर) या कालावधीत तळेगाव येथील पारीजात सोसायटीत महिलेच्या घरात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निरजकुमार विश्वंभर शाही Nirajkumar Vishwambhar Shahi (वय-43 रा. आंबिका पार्क, वतन नगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने महिलेच्या वयाचा गैरफायदा घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांना गंतवणूक स्किममध्ये (Investment Scheme) पैसे गुंतवल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी 12 लाख 70 हजार रुपये आरोपीला दिले.

यानंतर आरोपीने गुंतवलेल्या रक्कमेवरील परतावा रक्कम 1 लाख 52 हजार 400 आणि मुद्दल 12 लाख 70 हजार असे
एकूण 14 लाख 22 हजार 400 रुपये परत न करता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने
पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ (PSI Khamgal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सरकारची धडधड वाढली, जरांगे २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम, म्हणाले, ”कोरोनाच्या नावाखाली…”

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांचे धक्कातंत्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत, सरकारवर उपरोधिक टीका!

Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले

Vijay Wadettiwar On Sanjay Raut | ‘शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवणार’, राऊतांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…