Pune Pimpri Chinchwad Crime News | जमीन मोजण्यास विरोध केल्याने जीवे मारण्याची धमकी, हिंजवडी परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जमीन मोजण्यास विरोध केल्याने शिवीगाळ करुन कोयता उगारून पाच जणांनी तिघांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (PCPC Police) हद्दीतील कासारसाई येथील सर्वे नंबर 19 मध्ये शनिवारी (दि.16) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शब्बीरभाई करीमभाई मुलाणी (वय-59 रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज लोखंडे, दोन अनोळखी व्यक्ती व मोजणी (Land Survey) करणारे दोनजण यांच्यावर आयपीसी 143, 147, 149, 504, 506 (2) सह आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाणी यांची मुळशी तालुक्यातील कासारसाई (Kasarasai) येथील सर्व्हे नं. 19 येथे त्यांच्या मालकीची जमीन आहे. आरोपी फिर्यादी यांच्या जमिनीची मोजणी करत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे भाऊ युनुस मुलाणी व खलील मुलाणी यांनी आरोपींना मोजणी करण्यास विरोध केला. त्यावेळी सुरज लोखंडे याने त्याच्या अॅक्टिव्हा गाडीच्या डिकीतून कोयता काढून तो फिर्यादी व त्यांच्या भावावर उगारला. तसेच आम्ही ‘जमीन विकत घेतली आहे. आम्हाला जमिनीचा ताबा घ्यायचा आहे, आमची अडवणूक केली तर इथे रक्त सांडेल’, असे म्हणत सुरज लोखंडे याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके (PSI Yashwant Salunke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्लॉट देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक, व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर FIR

काळ्या जादूने स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; पाषाण परिसरातील प्रकार (व्हिडीओ)

तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भवानी पेठेतील घटना

पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी चिंचवडमधील घटना

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून, चाकण परिसरातील घटना

वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA