Pune Pimpri Chinchwad Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा (Jewelers Shop Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला लष्कर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली असून त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत. ही करावाई बुधवारी (दि.27) रात्री साडे नऊच्या सुमारास पुणे कॅम्प येथील बिशप शाळेच्या (Bishop School Pune Camp) समोरील मोकळ्या जागेत केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अरमान कमल ग्वाला (वय-25 रा. फाटापुलकोट, ता. रायगंज, पश्चिम बंगाल), सुमीत कुमार उर्फ राहुलकुमार रामसिंग यादव (वय-30 रा. जोराबगंज ठाणा कोडा जि. कठीयार, बिहार), सोनु कुमार रामनाथ यादव (वय-25 रा. नया टोला जि. कठियार, बिहार) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांवर आयपीसी 399 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे (PSI Mahendra Kamble) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत असताना बिशप शाळेच्या समोरील मोकळ्या
मैदानात काही इसम थांबले असून ते दरोडा टाकण्याची तयारी करत असल्याची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून तिघांना पकडले.
तर त्यांचे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
आरोपी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाण्याच्या तयारीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, टोच्या, मंकी टोपी असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिस्टल बाळगणाऱ्या एकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, बालाजीनगर परिसरातील घटना

Nashik Crime News | पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या चोरट्याला जालन्यातून अटक, नाशिक गुन्हे शाखेची कारवाई

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना