Pune Pimpri Chinchwad Crime News | आई आणि बहिणीला मारहाण, मुलगा व सुनेवर FIR; सांगवी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आई आणि दोन बहिणींना मारहाण (Beating) करुन धमकी देणाऱ्या मुलागा आणि सुनेवर सांगवी पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीच आणि 31 डिसेंबर रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास संत तुकाराम नगर, नवी सांगवी (Navi sangvi) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) बुधवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश रतन वंजारे व त्याच्या पत्नीवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकाच इमारतीत राहतात. 30 डिसेंबर रोजी आरोपी तळमजल्यावर राहत असलेल्या आईच्या घरी वॉशिंग मशीन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी दुपारी साडे बाराच्या सुमारास फिर्यादी यांच्या दोन मुली त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तर निलेश याने फिर्यादी व बहिणींना लाकडी दांडक्याने माराहण केली. तसेच तुमचा काय संबंध इथं यायचा, तुम्हाला जीवे मारीन (Threats to kill) अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जावयाकडून सासऱ्यांना मारहाण

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून जावयाने (Son-in-Law) सासऱ्यांना घरा बाहेर बोलवून शिवीगाळ केली. तसेच गळा धरुन खाली पाडून पायातील बुटाने तोंडावर व छातीवर मारुन सासऱ्यांना (Father-in-Law) गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमोल सांडु वाघ (वय-33 रा. सदाशिव पेठ) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल केला. याबाबत जखमी लक्ष्मण दादु ओव्हाळ (वय-65 रा. गुरुद्वारा रोड, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बनावट ओळखपत्र देऊन आयफोन व लोन घेऊन बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

NCP MP Amol Kolhe | भाजपा-शिंदे-पवार गटावर अमोल कोल्हेंचा निशाणा, ”रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण”

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त