Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक! जेवण बनवले नाही म्हणून पत्नीचा खून; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणांवरून पुण्यात हत्येच्या घटना घडत आहेत. जेवण बनवले नाही या कारणावरुन चिडून जाऊन नवऱ्याने पत्नाली बेदम मारहाण करुन तिचा खून (Murder) केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.20) रात्री दहा ते अकरा या दरम्यान दत्तनगर चौक स्वामी समर्थ लेन नं. 1 येथे घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मधुरा तानाजी कांबळे (वय-42 रा. दत्तनगर चौक, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती तानाजी शिवाजी कांबळे याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत मधुरा यांचा मुलगा पियुष तानाजी कांबळे (वय-19 रा. दत्तनगर चौक) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) शनिवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मधुरा कांबळे यांनी आरोपी तानाजी कांबळे याच्यासाठी जेवण बनवले नाही. याचा राग आल्याने आरोपीने मधुरा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. तसेच कानाखाली मारुन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या छातीत जोराने बुक्क्या मारल्या. यामध्ये मधुरा कांबळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा पियुष याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी तानाजी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील (API Swapnil Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या एकावर एसीबीकडून FIR

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची तरंग उत्सवाला भेट; नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत! 20 जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण, जरांगेंची मोठी घोषणा