Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून प्रतिबंधीत गुटखा जप्त, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा विक्री करताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने (Pimpri Chinchwad Crime Branch Unit 2 ) जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Pimpri Chinchwad Crime) सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथे केली. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

सुनील गंगाराम जस्वानी Sunil Gangaram Jaswani (वय-55 रा. साधु वासवानी निकेतन, वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत युनिट दोनचे विपुल रंगनाथ जाधव Vipul Ranganath Jadhav (वय-33) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात आयपीसी 328, 272, 273, 188 सह अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जस्वानी हा पिंपरी भाजी मंडई पुलाखाली
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत गुटखा (Gutkha) विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन आरोपीकडून 32 हजार 278 रुपयांचा गुटखा जप्त करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad Crime branch unit 2 action gutkha worth 32 Thousand rs seized 1 accused arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Suburban District Level Youth Award | मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल, पोलीस आयुक्तांना दिले कारवाई करण्याचे निर्देश

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन