Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातून सुटका, आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | फुस लावून पळवुन नेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातून सुरखरुप सुटका केली. तसेच मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी सकाळी सहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली होती. याबाबत मुलीच्या पालकांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरुन अज्ञात व्यक्ती विरोधात 363 कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.(Pune Pimpri Chinchwad Crime)

संवेदनशिल प्रकरण असल्याने चिखली पोलीस ठाण्यातील तपास पथकाची एक स्वतंत्र टीम तयार करुन मुलीचा तपास सुरु करण्यात आला. पतकाने चिखली, जाधववाडी परिसरातील अनेक सीसीटीव्ही तपासले असता मुलगी एका मुलासोबत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या तरुणाचा फोटो प्राप्त करुन चिखली परिसरात व्हायरल केला. त्यावेळी फोटोतील तरुण हा सुरोज रेजाउल शेख (वय-21 रा. कुदळवाडी मुळ. रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) असून तो कुदळवाडी परिसरातील चिकन सेंटरवर काम करत होता, अशी माहिती मिळाली.

तपास पथकाने त्याच्या मुळ गावी जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र तो त्याच्या गावी आला नसल्याची माहिती मिळाली. त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता तो हैदराबाद येथील शोईल शेख याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. तसेच तो नियमितपणे रुपसिंग ठाकुर या नेपाळी मुलाच्या ताब्यात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने ठाकुर याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो चंदिगड ते सिमला दरम्यान असलेल्या गावात वावरत असल्याची माहिती मिळाली.

तपास पथक तातडीने हिमाचल प्रदेशात रवाना करण्यात आले. पोलिसांनी दोन दिवस चंदीगड ते सिमला यादरम्यान
पहाडी भागातील खेडेगावात ठाकुर याचा शोध घेतला. त्यावेळी सोलन जिल्ह्यातील परवानु तालुक्यातील भोजनगर
येथे आरोपी सुरोज हा एका ठेकेदारकडे काम करत असल्याची माहिती मिळाली.
तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याने फुस लावुन पळवून नेलेल्या मुलीची त्याच्या ताब्यातून सुटका केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 शिवाजी पवार,
सहायक पोलीस आयुक्त संजय गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार अमर कांबळे, सुरज सुतार, कबीर पिंजारी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन फरार

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा