Pune Pimpri Crime | झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मान्सूनपूर्व कामासाठी (Pre-Monsoon Work) वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या (Tree Branch) अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या (MSEDCL) कर्मचाऱ्याला मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत रामेश्वर बळीराम वाघमारे Rameshwar Baliram Waghmare (वय-32) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) IPC 353, 332,323,504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

याबाबत रामेश्वर वाघमारे (वय-32 रा. म्हाडा वसाहत, संकल्प सोसायटी, आर बिल्डींग, मोरवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नागराज शंकर भांडेकर Nagraj Shankar Bhandekar (वय-45 रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.19) सकाळी पावणे बाराच्या सुमारास खराळवाडी येथे घडला आहे.( Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडांच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांना तुम्ही झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने कट करत आहात असे म्हणून शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने डोक्यात व उजव्या पायाच्या नडगीला मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहे. आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Pimpri Crime | MSEDCL employee beaten to death for cutting tree branches

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त