Pune Pimpri Crime News | आळंदीत अवैध गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) युनिट तीनच्या (Unit-3) पथकाने आळंदी परिसरातील सुरु असलेल्या अवैध दारु भट्टीवर छापा मारला आहे. या कारवाईत अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि.3) दुपारी दोनच्या सुमारास मरकळ गावाजवळील एका घराजवळ केली. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी चरणसिंग प्रभातसिंग रजपुत Charansingh Prabhatsingh Rajput (रा. मरकळ, ता. खेड) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युनिट तीनचे पोलीस शिपाई सागर बाळासो जैनक (Sagar Balaso Jainak) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

कार्तिक वारीच्या (Kartik Vaari) पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी मरकळ गावाजवळील चरणसिंग रजपुत याच्या घराजवळ अवैध गावठी हातभट्टी दारु तयार केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन एकत्र करुन त्याची भट्टी लावल्याचे आढळून आले. पथकाने भट्टी उद्धवस्त करून सव्वा लाखांचे 2500 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार