Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपपवरील लिंक ओपन करणं तरुणाला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखांचा गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असतात. चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला व्हॉट्सअ‍ॅवर आलेली लिंक ओपन करणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी (Pune Pimpri Crime) लिंकद्वारे तरुणाला तब्बल 2 लाख 53 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 10 जून 2022 ते 12 जून 2022 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत स्वप्नील विलास मुसणे (वय 26, रा. चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे) याने शुक्रवारी (दि.2) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 9007185081 मोबाइल धारक व त्या लिंकधारकावर आयपीसी 417, 420, आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील यांच्या मोबाइल नंबरच्या व्हॉट्सअॅपवर आरोपींनी एक लिंक पाठवली.
ती लिंक ओपन केली असता फिर्य़ादीच्या नावाचे Musne12 हे अकाउंट तयार झाले.
स्वप्नील याला एका लिंकवरून यावरून रोज टास्क मिळत होते. हे टास्क पूर्ण करून भरपूर नफा मिळवा असे आमिष आरोपींनी दाखवले.
या टास्कचे निमित्त करून आरोपींनी दोन दिवसांत फिर्य़ादी यांच्याकडून पेटीएमद्वारे दोन लाख 53 हजार रुपये घेतले.
परंतु फायदा मिळाला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वप्नील यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Opening the link on WhatsApp was expensive for the young man, the cyber thieves cheated him of two and a half lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड

Live In Relationship Rules In India | जाणून घ्या लिव्ह इन नात्याबद्दल भारतीय कायदे काय म्हणतात

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा