Pune Pimpri Crime | लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपात करण्यासाठी दिली 24 तुकडे करण्याची धमकी; वाकड मधील धक्कादायक प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून तरुणी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर तिला गर्भपात (Abortion Case) कर अन्यथा 24 तुकडे करण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार वाकड परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) ऑगस्ट 2021 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत रहाटणी आणि पुण्यात घडला आहे.

 

याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) सोमवारी (दि.12) फिर्याद (FIR) दिली आहे. पोलिसांनी मिलिंद वाघमारे उर्फ लखन Milind Waghmare alias Lakhan (रा. थेरगाव) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 313, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीसोबत ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी गरोदर राहिली. तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने गर्भपात केला तर लग्न करेन अन्यथा लग्न करणार नाही असे सांगितले. आरोपीने पीडित तरुणीला एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केला.

 

दरम्यान, तरुणीचे लग्न जमले. आरोपीने तिला धमकावून लग्न मोडण्यास भाग पाडले.
त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
तरुणी पुन्हा गरोदर राहिल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार देत गर्भपात करण्यास सांगितले.
गर्भपात केला नाहीतर ट्रेन खाली ढकलून देण्याची धमकी दिली.
तसेच 24 तुकडे करुन जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Raped a young woman by luring her to marry, threatened to cut her into 24 pieces for abortion; Shocking type in wakad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार