Pune PMC Employees Health Workshop | पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विषय जागरूकता निर्माण करण्यासाठीची कार्यशाळा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Employees Health Workshop | पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान वाढवणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळेचे मंगळवारी (दि.12) आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ 400 अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला. (Pune PMC Employees Health Workshop)

प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबतचे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्यानंतर ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन राजीव नंदकर (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले. नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे 200 अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या. (Pune PMC Employees Health Workshop)

यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यशाळेमुळे पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, राजीव नंदकर (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | सावधान! आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खबरदार, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 4 कोटींची फसवणूक करुन मागितली 15 कोटींची खंडणी, चार जणांवर FIR

RBI Job Notification 2023 | आरबीआयमध्ये काम करण्याची पदवीधर तरुणांना सुवर्णसंधी;
जाणून घ्या अटी

BJP on Uddhav Thackeray | ‘तूच आहे, तुझ्या अपमानाचा शिल्पकार…’, भाजप आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका