ATM मशीनची तोडफोड, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – हडपसर भागातील एटीएम मशिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावून मशीन उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण एकाला पकडण्यात यश आले आहे.

राहूल माणिक तुपेरे (वय ३०, रा. वुंâजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आकाश गायकवाड आणि कांबळे काल मांजरी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मुंबईतील एचडीएफसी बँकेने मांजरी परिसरातील त्यांच्या बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड झाल्याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस शिपाई गायकवाड आणि कांबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी राहूल एटीएम मशीनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला जागीच पकडले. अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like