सीसीटीव्हीच्या आधारे घरफोडी करणार्‍या दोघा सराईतांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात बंद फ्लॅट फोडून त्यातील लाखो रुपयांवर डल्ला मारणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. त्यांच्याकडून एक गुन्हा उघडकीस आला असून, अधिक तपास सुरू आहे.

राजू चंदू राठोड (वय 38, रा. वैदवाडी, पेट्रोल पंप) व दिनेश मनिलाल सोलंकी (वय 30, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उत्तमनगर परिसरातील गणपतराव गोडसे यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीन करत होते. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली होती. त्यात आरोपी कैद झाले होते. त्यांची माहिती घेतल्यानंतर दोघांची ओळख पटली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने या दोघांना हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दोघेही पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, राजू याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. तर, दिनेश याच्यावर 1 घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे.

Visit : Policenama.com