Pune Police | पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये ! धनकवडी परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | पुण्यातील धनकवडी परिसरात (Dhankawadi) कोयता आणि हत्यारे घेऊन (Koyta Gang In Pune ) दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी (Pune Police) चांगलाच धसका दिला आहे. त्यामधील 6 गुन्हेगारांना अटक (Arrested) करुन त्यांची सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) बालाजीनगरमधून (Balaji Nagar) धिंड काढली आहे (Pune Crime). धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपींची त्याच भागातून वरात काढली आहे. (Pune Criminals)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर रविवारी (3 एप्रिल) रोजी गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी संबधित आरोपींना चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून आज (गुरुवारी) त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून धिंड काढली. यामधील आरोपींनी यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत. 8 एप्रिलपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. (Pune Police)

दरम्यान, बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरवली जात आहे.
हातात कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जाताहेत.
फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे, पाया पडायला लावलं जात आहे आणि या घटनांचे व्हिडीओ शूट करुन दहशत पसरवली जात आहे.
अशा नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.
मात्र, पुणे पोलीस कडक कारवाई करत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात होता.
यानंतर आता पोलिस अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलिसांसह पोलीस पथकांनी आरोपींना चांगलांच दणका दिला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Police | Dhankawadi Balaji Nagar Sahakar Nagar Police Station police parade koyta gang accused on road in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा