सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलीसांचे महापालिकेला सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील अंधार्‍याठिकाणी पादचारांना अडवून होणार्‍या लुटमार तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना पुणे पोलिसांकडून महापालिकेला आला आहे. आंधाराच्या ठिकाणी प्रकाशझोत करावे असे या सूचनांमध्ये सांगण्यात आले असून, भुयारी मार्गांमध्ये कर्मचारी नेमावेत असे देखील सांगण्यात आले आहे.

हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर अत्याचारकरून खून केल्याचे समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर पुन्हा एखदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातही अशा घटना घडल्या आहेत. यानंतर नोकरदार महिलांसाठी पुणे पोलिसांनी बडीकॉप योजना सुरू केली. यासोबतच वेगवेगळ्या पातळीवर पोलीसांकडून महिला सुरक्षेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, शहरात एकट्या नागरिकांना मध्यरात्री लुटले जाते. त्यातही अंधार व निर्जनस्थळ पाहून अडविण्यात येते. शहरात अंधार असणारी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणांची माहिती पोलीसांनी घेतली. तसेच, ही माहिती पालिकेला देऊन तेथे प्रकाश दीवे लावावेत तसेच भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक नेमावेत यासह वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले की, अंधार असलेली ठिकाणे व निर्मुष्य ठिकाणांवर उपाययोजना करण्याबाबत महापालिकेला सांगितले आहे. यापूर्वी ही त्यांच्याशी समन्वय ठेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. तर, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविली असून, शंभर क्रमांकावर मदत मागितल्यास सात मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचून मदत करतील.

Visit : policenama.com