Coronavirus : ‘कोरोना’बाधीत असणाऱ्यांशी थेट संपर्क टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी केले अ‍ॅप तयार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना बाधीत असणाऱ्यांशी थेट संपर्क टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी अ‍ॅप तयार केले असून, होम क्वारटाईन असणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवली जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना या अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान हजारो नागरिकांना करोना संशयित म्हणून होम क्वारंटाईन केले जात आहे. परंतु हे लोक घरात न बसता बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांना या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार पुणे पोलिसांनी या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी 136 पथक तयार केली आहेत.

या व्यक्ती घरीच राहतात का हे पोलिसांना जाऊन पहावे लागेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी चेहऱ्याव्दारे ओळख पटविणारे अ‍ॅप विकसित केले आहे. या अपच्या मदतीने आता होम क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

पोलिसांनी विकसित केलेले अ‍ॅप हे सेल्फीवर आधारित आहे. करोना संशयितांचा सेल्फीव्दारे फोटो घेतला जाईल. त्यानंतर तो राहत असलेले ठिकाण, त्याचे नाव, फोन क्रमांक, सेल्फी व इतर सर्व माहिती त्या अ‍ॅपमध्ये भरली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीची माहिती एका क्लाऊड बेसमध्ये सर्व्हरमध्ये साठविली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तींवर सेल्फी व दाखविलेल्या स्थानासह नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी क्वारंटाईन केले आहे. त्या ठिकाण क्लाऊड बेसद्वारे लक्ष ठेऊन त्या व्यक्तीचा चेहरा ट्रकिंग करेल. त्या व्यक्तीचा चेहरा न जुळल्यास तत्काळ त्याचा अलर्ट पोलिस अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर पोलिस अधिकारी तत्काळ जाऊन त्या ठिकाणी संशयित व्यक्तीचा शोध घेतील. करोना संशयितांवर लक्ष ठेवण्याची हे अ‍ॅप खूपच फायदेशीर ठरेल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.