पूरपरिस्थितीशी दोन हात करण्यास पुणे पोलिस लागले कामाला…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   गेल्या वर्षी शहरात पावसाने थैमान घालत शहराचे हाल बेहाल केले होते. अनेकांना जीव गमवावा लागला होता, तर वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हा अनुभव पाठीशी घेऊन पुणे पोलिसांनी यंदा अशी परिस्थिती आल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाणी शिरणारी, साठणारी ठिकाणी, मदतीसाठी नेमण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष शाखेने हे आदेश दिले असून त्यानुसार ही सर्व माहिती विशेष शाखेला कळविली जाणार आहे.

गेल्या वर्षी मुसळाधार पाऊस झाला होता. या पावसाने तारांबळ तर उडवली होतीच पण कोंढवा आणि आंबेगाव परिसरात भिंती कोसळून जवळपास 25 मजुरांचा जीव गेला होता. तर रस्त्याना नदीचे स्वरूप आल्याने काहीजण वाहून देखील गेले होते. तर दुसरीकडे तळे भरल्यानंतर नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले होते. तसेच, अनेक पुल देखील पाण्याखाली होते. तसेच, रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या दृष्टीने महापालिका प्रशासनासोबतच पुणे पोलिसांनी देखील पूर्व पूर नियंत्रण नियोजन तयारी सुरू केली आहे. त्या संदर्भातील सर्व माहिती प्रत्येक पोलिस ठाण्याला गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती जमा झाल्यानंतर ती जिल्हाधिकाऱ्यांना देखील एकत्रित पाठविण्यात येणार आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्याने त्यांच्या वरिष्ठ व गुन्हे निरीक्षकांच क्रमांक, पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व त्यांना पोहता येणारे पाच कर्मचारी, हद्दीतील पोहता येणारे खासगी पाच व्यक्ती, होडी मालक व चालक, पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चौक्या व त्यांचे मोबाईल क्रमांक, पूर स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना आश्रय देता येतील, अशा ठिकाणाची माहिती गोळा करून पाठविण्याचे आदेश दिले आहे.

ही माहिती पाठविण्याच्या सूचना

गेल्या वर्षी पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांची सविस्तर माहिती

पूर आपत्ती व्यस्थापनासाठी पोलिसांना लागणारी साधन-सामुग्रीची सुस्थिती

पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती.

पुरामुळे बाधित होणारे, पूल, रस्ते, भुयारी मार्ग यांची यादी

धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गानुसार बाधित होणारी ठिकाणे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like