पुणे पोलिसांकडून ‘२६/११’ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

पुणे : पोलीसनाम ऑनलाईन – पुणे पोलिसांकडून ‘२६/११’ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवाजीनगर मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. स्वारगेट पोलीस स्टेशनचे हद्दीत सारसबाग या ठिकाणी पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांचे संयुक्‍त विद्यमानाने २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत जवळपास १८०० ते २००० हजार विध्यार्थीचा सहभाग घेतला होता.

Student

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम, सहपोलीस आयुक्‍त रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्‍त
संजय शिंदे, सुनिल फुलारी, अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा, बच्चन सिंह, स्वप्ना गोरे, शिरीष सरदेशपांडे, पोर्णिमा गायकवाड, प्रसाद अक्कानोरु, सुहास बावचे, पंकज देशमुख, संभाजी कदम यांच्यासह १५ विभागीय सहायक पोलीस आयुक्‍त, ९० पोलीस निरीक्षक व सपोनि/पोउनि आणि १०० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. नाईकवाडी यांनी केले व संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन केले.

Visit : Policenama.com