चतुश्रृंगी परिसरातील पान टपर्‍यांवर छापेमारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील चतुश्रृंगीत परिसरात पोलिसांनी छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री करणार्‍या टपर्‍यांवर छापेमारी करत दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तीन टपरी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बंदी असणारा गुटख्याची तेजीत विक्री सुरू आहे. गुटख्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, पोलिसांना येथील परिहार चौकातील गिरीधर हॉटेल शेजारी टपरीमध्ये सतीश भगत गुटखा विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तर, घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच, विठ्ठल मुल्या याच्या चंद्रमा पान स्टोअरमधून 1 हजार 800 आणि बाबूलाल चौधरी यांच्या आईमाता दुकानातून 7 हजार 300 रुपयांचा गुटखा जप्त केला.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, लक्ष्मण बांगर, सतीश चव्हाण, अरुण साबळे, सतीश मुंडे, रुपाली भरेकर, सतीश लांडगे यांच्या पथकाने केली.