पुण्यात मास्क न वापरणार्‍या तब्बल 600 जणांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांना बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले असताना नागरिक मास्क न घालताच बाहेर पडत आहेत. अश्या 600 हुन अधिक नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दररोज 40 पेक्षा जास्त नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांची चिंताजनक रित्या संख्या वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांना घर बाहेर पडण्यास मनाई केली आहे. अत्यावश्यक असल्याचं नागरिकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळी देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मास्क न घातल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 188 व साथरोग अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले जातील, असे स्पष्ट केले होते.

मास्क घालणे हे नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पण, अनेकजण भाजी, किरणामाल खरेदीसाठी बाहेर पडताना मास्क घालत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, सकाळी फिरण्यासाठी जाताना देखील काही नागरिक मास्क घालत नसल्याचे कारवाई वरून दिसून आले आहे. 26 एप्रिल परियंत 600 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल केले होते. तरीही नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई वाढविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात साधारण 40 ते 45 जणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी खूपच अत्यावश्यक असेल तरच मास्क घालूनव बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

मास्क न घालणाऱ्या काही जणांस शिक्षा

बाहेर पडताना मास्क न घातल्यामुळे अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. तसेच, त्यांच्यावर कोर्टात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर त्या नागरिकांना कोर्टाने एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे गुन्हे दाखल झाल्यामुळे नागरिकांना नोकरीसाठी लागणारे चारित्र्य प्रमाणपत्र, पासपोर्टसाठी अडचण येणार आहे.