पुण्यात 3 पोलीस निरीक्षकांसह 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील तीन पोलिस निरीक्षकांसह पाच अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सर्वांनाच नेमके बदल का असा प्रश्न पडला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत निंबाळकर, विजय पुराणीक आणि सुचेता खोकले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार व संतोष तासगवकर अशी नेमणूक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चंद्रकांत निंबाळकर व सुचेता खोकले या वाहतूक शाखेत होते. तर विजय पुराणीक हे सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तसेच सहाय्यक निरीक्षक तासगवकर आणि पवार हे गुन्हे शाखेत होते. मात्र त्याची आता प्रशासकीय कारणास्तव अर्थिक गुन्हे शाखा येथे पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात आली आहे.  या अचानक बदलामुळे मात्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे.